राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची उपस्थिती

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला केला आहे.  गुरुवारी दुपारी  पत्रकार परिषद घेत राहुल यांनी निवडणूक यंत्रणेवर आणि कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचं सांगत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. त्यासोबतच निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत. पाच वर्षामध्ये हिमाचल राज्यातील लोकसंख्येइतके मतदार कसे वाढले असं राहुल गांधी विचारलं आहे. महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार वाढले, २०१९ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये ३४ लाख मतदार वाढले. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपक्षा जास्त मतदार आहेत. मतदार यादीमध्ये अनेक अनियमितता आढळल्या. लोकसभेला जेवढी मते होतीत तेवढीच विधानसभेला मिळाली. वाढलेल्या मतदारांची आम्हाला नाव पत्ता आणि फोटोसह यादी हवी. महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष तुम्हाला मतदारांची यादी मागत आहेत. देशातील युवांना मला सांगायचंय की पाच वर्षामध्ये जेवढे मतदार यादीमध्ये जोडली गेलीत त्यापेक्षा जास्त पाच महिन्यांमध्य गेली. महाराष्ट्राची वयस्क लोकसंख्या ९.५४ कोटी आणि निवडणूक आयोगाच्या मते ९.७ कोटी मतदार आहेत. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे काय? कामठी मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १.३६ लाख मते पडली आहेत. विधानसभेला जवळपास १.३४ लाख तवेढीच मते पडली आहेत. लोकसभेला आम्ही जिंकलो. या मतदारसंघात ३५ हजार नवीन मतदार जोडले जातात आणि ही सगळे मते भाजपला जातात आणि भाजपचा विजय होतो. महाराष्ट्रात असं अनेत मतदारसंघात झालं आहे. काँग्रेसची मते वाढली नसून भाजपची मते वाढली आहेत. आम्हाला विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी आम्हाला मिळायला हवी. निवडणूक आयोगाचं काम आहे की मतदारांची यादी तिन्ही पक्षाला मिळायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. देशाचं निवडणूक आयोग जिवंत असेल तर राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांनी उत्तरे द्यावी. निवडणुक आयोग हे केंद्रातील सत्तेचे गुलाम असून ते मेलेले आहे. मतदार यादीतील वाढलेली ३९ लाख मते फिरत असतात. ती मते आता बिहार तिथून उत्तर प्रदेशकडे जाणार आहेत. ही मते दिल्लीमध्येही गेली असून ही फिरती मते आहे. कारण भाजप या मतांच्या आधारावरच निवडणुका जिंकत आहे. जनतेने आता जागृत व्हायला हवं. आम्ही तर लढणाक आहोतच पण मीडियानेसुद्धा हा प्रश्न सरकारला करायला हवा, असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.