राहुल गांधींचा शेतकरी आत्महत्यांवरुन राज्य सरकार आणि केंद्रावर हल्लाबोल

छतरपूर (मध्य प्रदेश) : बागेश्वर धाममध्ये आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली.
धीरेंद्र शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी सकाळी आरतीनंतर पावसामुळे
जमलेले भाविक टिनशेडखाली थांबले होते, त्याचवेळी अचानक
टिनशेड कोसळले. या दुर्घटनेत अयोध्येच्या राजेश कुमार कौशल या भाविकाचा जागीच
मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ छतरपूर जिल्हा रुग्णालयात
नेण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, एका
रुग्णाचे सीटी स्कॅन करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मृत व्यक्तीचे
पोस्टमार्टम करण्यात आले आहे.
ही दुर्घटना सकाळी ७.३० च्या
सुमारास घडली, जेव्हा पावसापासून
वाचण्यासाठी लोक तंबूत थांबले होते. मृत राजेश कुमार कौशल हे बुधवारी रात्री
आपल्या ६ कुटुंबीयांसह बागेश्वर धामात आले होते. ते धीरेंद्र शास्त्री यांच्या
दर्शनासाठी उपस्थित होते. धीरेंद्र शास्त्री सध्या बागेश्वर धाममध्येच आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक धामात जमले असून, सोशल
मीडियावरून मोठ्या प्रमाणावर आवाहन केले गेले आहे. शास्त्री यांनी त्यांच्या
वाढदिवसानिमित्त रुग्णालयासाठी विटा दान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान,
ही घटना वाढदिवसाच्या उत्सवात गालबोट लावणारी असून, भाविकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून
अधिकृत चौकशी सुरू असून सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे.