ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषी हल्ला — चरणप्रीत सिंह गंभीर जखमी, समुदायात संताप

अ‍ॅडलेड (ऑस्ट्रेलिया):- ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड शहरात भारतीय विद्यार्थी चरणप्रीत सिंह याच्यावर झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्याने खळबळ उडाली आहे. हा हल्ला १९ जुलै रोजी रात्री ९.२२ वाजता किंटोर अव्हेन्यूजवळ घडला. चरणप्रीत आपल्या पत्नीसोबत कार पार्क करत असताना पाच जणांच्या गटाने त्यांना घेरले आणि थेट हल्ला केला. हल्लेखोरांनी शिवीगाळ करत धारधार वस्तूंनी चरणप्रीतवर वार केले. या भीषण हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर फ्रॅक्चर झाले असून मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्यावरच तो बेशुद्ध पडलेला आढळून आला. व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आरोपी चरणप्रीतला लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. त्यानंतर ते गाडीने फरार झाले. एकाला अटक, चारजण फरार दुसऱ्या दिवशी एनफिल्ड येथून एका २० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र इतर चौघे फरार असून पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. भारतीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया या घटनेनंतर अ‍ॅडलेडमधील भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला असून, भारत सरकारने आणि ऑस्ट्रेलियन प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.