पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; ८५ किलो हेरॉईन जप्त, किंमत ५०० कोटी

तारणतारण : पंजाब पोलिसांनी वर्ष २०२५ मधील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्स विरोधी कारवाई करत ५ किलो हेरॉईन जप्त केली आहे. या कारवाईत पाकिस्तानच्या ISI आणि यूकेस्थित कुख्यात ड्रग तस्कर लल्ली यांच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अमरजोत सिंह उर्फ जोता संधू, रहिवासी भिटेवाड, अमृतसर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा हस्तगत करण्यात आला. तो सीमापार तस्करांकडून हेरॉईन मिळवून संपूर्ण पंजाबभर वितरण करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, या कारवाईतून अमरजोत सिंहच्या ISI आणि यूके कनेक्शनची पुष्टी झाली असून, त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणा त्याच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक संपर्कांचे धागेदोरे शोधत आहेत. आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे. पंजाब पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “राज्याला ड्रग्सपासून मुक्त करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला या कारवाईने अधिक बळ दिले आहे.