पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
.jpeg)
पुणे : नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ एक भीषण अपघात झाला
आहे. यात आयशर आणि एसटीच्या मध्ये आल्यानंतर छोटा आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला
आहे. या घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय
रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची
प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. या बाबत
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार पुणे - नाशिक महामार्गावर जात असताना एसटीच्या
मागे हा छोटा टेंम्पो जात होता. तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होती.
मात्र आयशरने जोरात धडक दिल्याने छोटा टेम्पो हा बसवर जाऊन आदळला. दोन्ही
गाड्यांच्यामध्ये आल्याने छोटा टेम्पो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.