पुण्यातील तरुणाने बायकोचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले; बेंगळुरूमध्ये घडलेला थरार

बेंगळुरू -
उत्तर प्रदेशमधील सौरभ-मुस्कान प्रकरणानंतर बेंगळुरूमध्ये आणखी एक भयावह घटना समोर आली आहे. पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीयर राकेश खेडकर (वय 36) याने आपली पत्नी गौरी सांबेकर (वय 32) हिची निर्दयपणे हत्या केली. घटनेनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले आणि बाथरूममध्ये लपवले. वादातून घेतले प्राण पोलिसांच्या माहितीनुसार, राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणांवरून वारंवार वाद होत होते. बुधवारी रात्री जेवणाच्या वेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर संतप्त राकेशने किचनमधील चाकू घेऊन गौरीवर प्राणघातक हल्ला केला. तीन वार केल्यानंतर त्याने गौरीचा गळा चिरला. मृतदेह सुटकेसमध्ये भरला हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यांना सुटकेसमध्ये भरून बाथरूममध्ये ठेवले. त्यानंतर तो घाबरून घर सोडून पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपीने आपल्या सासरच्यांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांची त्वरित कारवाई

गौरीच्या कुटुंबीयांनी त्वरित बेंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या २४ तासांत पुण्यातून आरोपीला अटक केली. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.