प्रभाग १२ मध्ये पल्स पोलिओ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे महापौरांचे आवाहन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण
अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक १२ मधील संगमेश्वर नगर, अक्कलकोट
रोड येथील अंगणवाडी क्रमांक १३२ (केंद्र क्रमांक ३२८) तसेच रश्मी
हांचाटे प्रशाला येथे रविवारी पल्स पोलिओ लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात
आली. या अभियानाचा शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते बालकांना
पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी पालकांशी संवाद साधत पाच
वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे ही प्रत्येक
पालकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. "पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी
कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नका," असे
आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक राजकुमार हांचाटे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, रामदास मगर, योगेश सोनावणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्नजीत वाघचौरे, पीएचएन शैलेश सानप, एएनएम सपना खैरे तसेच आशा सेविका अंबिका देढे उपस्थित होत्या. लसीकरण केंद्रावर आलेल्या पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण पोहोचावे यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. सोलापूर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना आपल्या परिसरातील पल्स पोलिओ केंद्रावर जाऊन पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन केले आहे.