कंटेनरमधील एसी चोरणारे जेरबंद; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर,:- मालवाहतूक कंटेनरमधून इलेक्ट्रीकल
सामानाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे
शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २८
१० लाख ५० हजार रुपयांचे केल्व्हीनेटर कंपनीचे एसी संच जप्त केले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक
बाबूलाल सोळूंके (वय ४७), शहाजी पठाण गायकवाड (वय २३) आणि
प्रदीप रमेश चिंचकर (वय २६, सर्व रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहतीत चोरीचे एसी
विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस एलसीबी पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस
निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
व त्यांच्या पथकाने टाकळी सिकंदर येथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १०.५० लाख रुपयांचे २८ केल्व्हीनेटर एसी संच जप्त करण्यात आले.
आरोपींनी एप्रिल अखेरीस अहमदनगर (सुपा) येथून कोची (केरळ)
येथे जाणाऱ्या बंद बॉडी कन्टेनरच्या चालकाशी संगनमत करून, वाहनाचे सील तोडून ही चोरी केली होती. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस
निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ,
फौजदार खाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण
गोलेकर, धनाजी गाडे, पोलिस अंमलदार
मोहन मनसावाले, दिनेश
पवार, अक्षय डोंगरे आदींनी केली.