यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दि. २८ रोजी विजयपूरात निषेध मोर्चा

विजयपूर :- प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केलेले
शहर आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दि
२८ एप्रिल सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे केपीसीसी सदस्य अब्दुल
हमीद मुश्रीफ यांनी सांगितले. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चास
सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत जाऊन बसवनगौडा पाटील यांच्यावर
कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला
देण्यात येणार असल्याचे सांगितले. यत्नाळ हे राजकीय टिका करु देत अथवा आमच्यावर
वैयक्तिक टीकाही करू देत मात्र आमचं धर्मगुरू प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल
अवमानकारक वक्तव्य आम्ही व आमचा समाज कदापि सहन करणार नाही. शहरातील विकास कार्य, कार्यक्रम
सोडून मुस्लिम समाजाविरोधात बोलणे हे त्यांचं फॅशन झाले असून सर्व सामान्य नागरिक
ही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कंटाळलेले आहेत. या पत्रकार परिषदेत टपाल
इंजिनिअर, एम.सी. मुल्ला, शकील बागमारे,
फयाज कलादगी व इतर उपस्थित होते.