हाय प्रोफाइल परिसरात वेश्याव्यवसाय; बाप-लेकासह तिघांवर गुन्हा दाखल
.jpeg)
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू भाग म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी छापा टाकून हाय
प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सिराज चौधरी आणि वसीम चौधरी
या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, एका महिला
व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
बाणेरमधील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या
व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला आणि सेक्स रॅकेट
उघड झाले. या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र वैश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA
Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्चभ्रू ग्राहकांची उपस्थिती
पोलिस तपासानुसार, हे स्पा सेंटर हाय प्रोफाइल
परिसरात असल्याने ग्राहक व महिला सुद्धा उच्चभ्रू वर्गातील होते. त्यामुळे या
प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी इतर स्पा सेंटरवरही छापे
टाकण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आणखी धक्कादायक माहिती
उघड होण्याची शक्यता आहे. ब्लॅकमेल आणि पत्रकारितेचा गैरवापर आरोपी वसीम चौधरी आणि
त्याचे वडील सिराज चौधरी स्थानिक वृत्तपत्र चालवत होते. तपासात असं समोर आलं आहे
की, या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू
होते. वसीम स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पा आणि ब्युटी सलूनमध्ये रेकॉर्डिंग
करत असे, त्यानंतर महिलांना वेश्याव्यवसाय करायला भाग पाडत होता.
पार्श्वभूमी आणि मागील गुन्हे सिराज चौधरी याला यापूर्वीही ठाणे पोलिसांनी
बलात्कार प्रकरणात अटक केली होती. त्याचा मुलगा वसीम हा ‘२४
थाई स्पा’चा मालक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे
दाखल केले असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरू आहे.