प्रा. युवराज सोलापूरे यांना ‘उत्कृष्ट जिल्हा समन्वयक’ पुरस्कार

सोलापूर : संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त), सोलापूर येथील अर्थशास्त्र
विभागातील प्रा. युवराज सोलापूरे यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी झालेल्या
राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र
राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र
‘करिअर कट्टा’ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पॉवर सेक्टर स्किल कौन्सिलचे
सेक्रेटरी मा. प्रफुल्ल पाठक यांच्या हस्ते प्रा. सोलापूरे यांना पुरस्कार प्रदान
करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष
मा. यशवंत शितोळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा. सोलापूरे
यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.