बांगलादेश हिंदूंसाठी प्रियंका गांधी खास बॅगेसह संसदेत
.jpeg)
नवी दिल्ली, दि. १७-
नवी दिल्ली: संसद परिसरात काँग्रेस खासदारांनी खासदार
प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वात बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या
अत्याचारावर केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले.
प्रियंका गांधींनी संसदेचे हिवाळी अधिवेशन विविध
मुद्द्यांनी गाजवल्याचे पाहायला मिळत आहे. प्रियंका मंगळवारी संसदेत खांद्याला एक
खास बॅग अडकवून आल्या होत्या. ज्यावर बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर
होणाऱ्या अत्याचाराविरोधात उभे राहा, असे लिहिले होते.
मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी
संसद परिसरात काँग्रेस खासदारांनी बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या
अत्याचारावर केंद्र सरकार काहीही बोलत नाही म्हणून आंदोलन केले. यावेळी प्रियंका
यांच्या हातात बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्यामागे उभे राहा असे लिहिलेली
बॅग होती. दरम्यान काँग्रेस खासदारांच्या आंदोलनावेळी सर्वांच्या हातात ही खास बॅग
दिसली. यानंतर पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी 'नेहरूंची पणती' असे म्हणत प्रियंका गांधींचे कौतुक
केले होते. तसेच असे कोणतेही पाऊन न उचलणाऱ्या पाकिस्तानी खासदारांवर त्यांनी टीका
केली होती.