पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान

प्रयागराज : पंतप्रधान
नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभाला भेट देणार असून उद्या बुधवार
५ फेब्रुवारी रोजी संगममध्ये पवित्र स्नानदेखील करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी यांचा उद्याचा संपूर्ण दौरा निश्चित झाला आहे. पंतप्रधान ५
फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रयागराज विमानतळावर पोहोचतील. ते प्रयागराज
विमानतळावरून डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील, तेथून ते १०.४५ वाजता अरेअल घाटावर
जातील. ते अरियाल घाटावर बोटीने महाकुंभाला पोहोचतील. ते सकाळी ११ वाजता प्रयागराज
येथील संगम येथे पवित्र स्नान करतील. महाकुंभमेळ्यात सकाळी ११ ते ११.३० ही वेळ
पंतप्रधानांसाठी राखीव आहे. पवित्र
स्नानानंतर, पंतप्रधान मोदी ११.४५ वाजता बोटीने अरेअल घाटावर
परततील. येथून ते डीपीएस हेलिपॅडने प्रयागराज विमानतळावर पोहोचतील. पंतप्रधान मोदी
दुपारी १२.३० वाजता हवाई दलाच्या विमानाने प्रयागराजहून परततील.