पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिवरायांना अभिवादन

नवीदिल्ली : रयतेचे राजे आणि समस्त मराठी मनाचे आराध्य दैवत  शिवछत्रपतींचा जयंती सोहळा आज राज्यासह देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असे पतंप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करत आहे.