पंतप्रधान मोदी महाकुंभामध्ये सहभागी होणार

प्रयागराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याला
भेट देण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.
पंतप्रधानाबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २७ जानेवारी रोजी तर उपराष्ट्रपती
जगदीप धनखड १ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू १० फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाकुंभ सुरू
होऊन ९ दिवस झाले आहेत. या काळात सुमारे ९ कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान
केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभात एकूण ६
स्नान होणार आहेत, त्यापैकी तीन अमृत स्नान आहेत. तीन अमृत
स्नानांपैकी एक आधीच झाले आहे, ज्यामध्ये सुमारे साडेतीन
कोटी लोकांनी भाग घेतला होता. १३ वेगवेगळ्या आखाड्यांमधील संत आणि साधू देखील
होते. महाकुंभात दररोज सुमारे १० लाख भाविक गंगा नदीत स्नान करतात. १९
जानेवारीपर्यंत ८.२६ कोटी लोकांनी संगमात स्नान केले आहे.