पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये दाखल आज करणार 'महाकुंभ स्नान'

प्रयागराज:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी  प्रयागराजमध्ये खास विमानाने दाखल झाले आहेत ते  महाकुंभात सहभागी होणार असून सकाळी ११ वाजता त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह राज्य सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री मोदींसोबत उपस्थित राहणार आहेत. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत १४ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनीही संगमात आस्थेची डुबकी घेतली. अनेक देशांच्या प्रतिनिधींनीही महाकुंभात स्नान केले आहे.