राष्ट्रपती मुर्मू यांनी केले महाकुंभात पवित्र स्नान

प्रयागराज : महाकुंभमेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सोमवारी पवित्र स्नान केले. त्यांनी त्रिवेणी संगमावर
पुजा, प्रार्थना आणि गंगा आरती केली. यावेळी उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. पवित्र
संगमावर स्नान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाकुंभमेळ्याचे अजून १७
दिवस शिल्लक आहेत. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रयागराजमध्ये त्रिवेणी
संगमात पवित्र स्नान केले. प्रयागराजमध्ये दाखल झाल्यानंतर महापौर उमेश चंद्र गणेश
केसरवानी यांनी मुर्मू यांचे स्वागत केले.