प्रयागराजकडे जात असलेल्या वाहनाला अपघात: विजयपूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

विजयपूर : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू
असलेल्या महाकुंभ मेळ्यात भाग घेण्यासाठी विजयपूर जिल्ह्याच्या चडचाण येथून
गेलेल्या यात्रेकरूंच्या वाहनाने गुजरात राज्यातील पोरबंदर जवळ उभ्या असलेल्या
टिपरला धडक दिल्याने चडचाण येथील दोन यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात
सोमवारी मध्यरात्री घडला. जिल्ह्यातील चडचाण येथील विश्वनाथ अवजी (वय 55) आणि
मल्लिकार्जुन सद्दलगी (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे. चालकासहित एकूण 17 जण मॅक्सी
कॅबमधून प्रयागराज कडे प्रवास करत होते, त्यातील चार जण जखमी झाले असून, त्यांना
पोरबंदर येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालक झोपेत
असताना हा अपघात घडला असवा असे सांगितले जात आहे.