‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ (PM-VBRY): पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना मिळणार ₹१५,००० ची मदत

नवी दिल्ली | १ ऑगस्ट २०२५
देशातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PM-VBRY) १ ऑगस्टपासून देशभर लागू केली आहे. ही योजना अशा तरुणांसाठी आहे जे पहिल्यांदाच नोकरी करणार आहेत. सरकार अशा पात्र युवकांना ₹15,000 ची थेट आर्थिक मदत देणार आहे.

या योजनेचं उद्दिष्ट ३.५ कोटी नवीन रोजगार संधी निर्माण करणं, उत्पादन क्षेत्राला चालना देणं, आणि तरुणांना संघटित क्षेत्रात सामाजिक सुरक्षा प्रदान करणं आहे.

📌 योजनेचे महत्त्वाचे मुद्दे:

  • पहिली नोकरी असलेल्यांना ₹15,000 ची मदत (दोन हप्त्यांत)
  • मासिक पगार ₹1 लाख पेक्षा कमी असावा
  • EPFO नोंदणी आवश्यक
  • आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक
  • रक्कम थेट आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल

🏢 कंपन्यांसाठी प्रोत्साहन:

  • प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी दरमहा ₹3,000 प्रोत्साहन
  • लहान कंपन्यांसाठी किमान 2, तर मोठ्या कंपन्यांसाठी 5 नोकर भरती अनिवार्य
  • उत्पादन क्षेत्रासाठी प्रोत्साहन कालावधी 4 वर्षांपर्यंत

💰 बजेट आणि कालावधी:

  • सरकारकडून ४ वर्षांसाठी ₹99,446 कोटींचं बजेट
  • पूर्वीची Employment Linked Incentive योजना आता PM-VBRY मध्ये रूपांतरित

ही योजना ‘मेक इन इंडियामोहिमेला गती देणार असून, भारताच्या रोजगारक्षमता आणि उत्पादन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ करणार आहे.