‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून राजकारण तापलं : रोहित पवारांचा सवाल, बावनकुळे यांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जीआरनंतर “देवाभाऊ” या शब्दासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातींवरून राज्यात राजकीय वादंग पेटला आहे.

 रोहित पवारांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट सवाल केला आहे.
त्यांनी म्हटलं –

  • जाहिराती निनावी का छापल्या?
  • सरकारने पैसे नसल्याचं सांगून योजना बंद केल्या असताना करोडो खर्च करून जाहिरात का?
  • जर जाहिराती भाजपने दिल्या असतील तर पक्षाच्या नावाने का नाही?
  • एखाद्या कंपनीनं उपकाराची परतफेड म्हणून दिल्या का?

रोहित पवारांनी आरोप केला की महसूलमंत्री म्हणून बावनकुळे यांनी ९० कोटींचा दंड एका कंपनीचा माफ केला होता आणि त्या बदल्यात जाहिराती दिल्या असाव्यात, असं सूचक विधान त्यांनी केलं.

 बावनकुळेंचं प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं –
रोहित पवारजी, फार मोठा शोध लावलात! मी कोणत्या कंपनीचा ९० कोटींचा दंड माफ केला हे सिद्ध करा, अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या.”

बावनकुळे यांनी जाहिराती कुणी दिल्या याचा खुलासा केला नाही. त्यामुळे प्रकरणावरून राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.