अंजली भारतीच्या वक्तव्यावर राजकीय संताप: अमृता फडणवीस यांच्याबाबत गलिच्छ टीका; किशोरी पेडणेकरांचा निषेध, चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी
गायिका अंजली भारती हिने एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या अत्यंत
आक्षेपार्ह आणि गलिच्छ वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल
बलात्काराच्या संदर्भात खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केल्याचा आरोप अंजली भारतीवर
होत आहे. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत
आहे. ठाकरे गटाकडून तीव्र निषेध या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त
केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्या म्हणाल्या, “सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस जी यांच्या पत्नी अमृता फडणवीस जी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका
अंजली भारती यांनी केलेल्या वक्तव्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या
महिला आघाडीकडून तीव्र निषेध करण्यात येतो.” चित्रा वाघ
यांची कठोर कारवाईची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या वक्तव्यावर
संताप व्यक्त करत थेट कारवाईची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, “मी अंजली भारती यांचा व्हिडीओ पाहिला आणि तळपायाची आग मस्तकात गेली.
राजकीय मतभेद असू शकतात, पण भर कार्यक्रमात
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत गलिच्छ बोलणे, तेही एका
महिलेने, हे अत्यंत घृणास्पद आहे.”
चित्रा वाघ यांनी पुढे स्पष्ट केले की, अंजली भारती आणि
संबंधित कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. बाबासाहेबांच्या
फोटोसमोर वक्तव्यावरही संताप चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत
म्हटले की, “श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
फोटोसमोर उभं राहून बलात्काराची चिथावणी देणारी भाषा आणि त्यावर टाळ्या व पैसे
उधळले जाणे हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. मात्र बाबासाहेबांनी दिलेलं
संविधान आमच्याकडे आहे आणि कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती
आहे.”
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया या प्रकरणानंतर सोशल
मीडियावर नागरिकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अंजली भारतीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात
होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर अंजली भारतीकडून अद्याप
कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.