PM मोदींची बिकानेर भेट; करणी माता मंदिरात घेतले दर्शन

बिकानेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे पोहोचले. दौऱ्याची सुरुवात त्यांनी करणी माता मंदिरात दर्शन घेऊन केली. यावेळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह ते उपस्थित होते. पंतप्रधानांनी मंदिरात प्रार्थना केली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. मंदिरात लपलेले गूढ – २५,००० उंदरांचे मंदिर बिकानेरजवळील देशनोक गावात असलेल्या करणी माता मंदिराची खासियत म्हणजे येथे २५,००० पेक्षा अधिक उंदीर वास्तव्य करत आहेत. हे उंदीर मंदिरात मुक्तपणे फिरतात आणि त्यांना "काबा" म्हणून पूजले जाते. मंदिरातील पुजारी गजेंद्र यांनी सांगितले की, “राजस्थानच्या सीमेवरील सैनिकही पोस्टिंगपूर्वी या मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात.” देशनोक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन मंदिर दर्शनानंतर पंतप्रधानांनी अमृत भारत योजनेअंतर्गत नव्याने विकसित झालेल्या देशनोक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बिकानेर-मुंबई एक्सप्रेस या नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते पलाना गावात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.