"मोदी संतासारखे, शहा धाडसी; त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित" – मुख्यमंत्री रेखा गुप्ता

नवी दिल्ली (११ एप्रिल): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संतसमान व्यक्तिमत्त्व मानत, तर गृहमंत्री अमित शहा यांच्या धाडसी निर्णयक्षमतेचे कौतुक करत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या आदर्शावर घडवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी हे विधान 'पीटीआय'ला बुधवारी संध्याकाळी दिलेल्या
मुलाखतीत केलं. रेखा गुप्ता म्हणाल्या, "अमित शहा हे धाडसी व्यक्तिमत्त्व
आहेत. कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि त्या निर्णयावर ठाम राहण्याची
वृत्ती मला खूप प्रेरणादायी वाटते. त्यामुळे मला त्यांच्या सारखे व्हायला आवडेल." त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल त्या म्हणाल्या, "मी पंतप्रधान मोदी यांना संतासारखे मानते. संत जसा
ईश्वरभक्तीत लीन असतो, तसंच मोदी राष्ट्रभक्तीत लीन आहेत." यासोबतच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही आदर्श नेता म्हणून उल्लेख केला आणि "पक्षात असे अनेक नेते आहेत
ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्र आणि पक्षासाठी समर्पित केले," असेही सांगितले.