मुंबईतील संवेदनशील भागांचे फोटो, व्हिडिओ पाकिस्तानला? तपास सुरु

मुंबई : हरियाणातील यूट्यूबर
ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली अटक
करण्यात आली आहे. तिच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेसाठी (ISI) काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, चौकशीत तिचे मुंबई
कनेक्शन समोर आले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सुरक्षा
यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईत संवेदनशील भागांचे शूटिंग 2023 आणि 2024 मध्ये ज्योतीने अनेक वेळा मुंबई दौरा केला.
यावेळी तिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि संवेदनशील ठिकाणांचे फोटो, व्हिडीओ काढले. हे फोटो तिने नंतर डिलीट केले, मात्र
स्पेशल रिकव्हरी डिव्हाईसद्वारे पोलिसांनी ते पुनः प्राप्त केले आहेत. हे फोटो आणि
व्हिडीओ कोणाला पाठवले, याचा सध्या तपास सुरू आहे.
कधी कधी आली मुंबईत?
- जुलै
2024:
लक्झरी बसने मुंबईत आगमन
- ऑगस्ट
2024:
कर्णावती एक्स्प्रेसने अहमदाबादहून मुंबई
- सप्टेंबर
2024:
दिल्लीहून मुंबई दौरा
- 2023:
गणपती उत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन
गणेशोत्सवाच्या वेळी लाखोंच्या
गर्दीचा आणि परिसराचा व्हिडीओ तिने शूट केला होता, जो देशविरोधी
हेतूंनी वापरण्यात आला असण्याची शक्यता आहे. यामुळे धार्मिक व सांस्कृतिक
स्थळांबाबत सुरक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. गुप्तहेर संपर्क आणि कबुली हिसार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानातील ISI
एजंट शाकीर, राणा शाहबाज आणि अली हसन यांच्या
संपर्कात होती. तिने कबूल केलं की, शाकीरचा नंबर ‘जट रधाँवा’
नावाने सेव्ह केला होता आणि व्हॉट्सअॅप, टेलिग्राम,
स्नॅपचॅटवरून सातत्याने देशविरोधी माहिती पाठवली. तिने दिलेल्या
कबुलीनुसार, दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने
पाकिस्तानात दोन वेळा प्रवास केला. तसेच दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात भेटी
घेतल्याचेही मान्य केले. तिच्याकडून ३ मोबाइल, १ लॅपटॉप आणि
इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. बँक
खात्यांची चौकशी ज्योतीच्या चार बँक खात्यांची चौकशी सुरू असून, कोणत्या माध्यमातून पैसे आले आणि त्या व्यवहारांचे नेमके स्वरूप काय होते,
हे तपासले जात आहे.