पाकिस्तानमध्ये पुन्हा पेट्रोल डिझेल महागले, जनतेवर भार
.jpeg)
दीर्घकाळापासून आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानावर महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमती पुन्हा वाढवल्या असून, या वाढीमुळे नागरिकांचे जीवन आणखी कठीण होणार आहे. मंगळवार रात्री पाकिस्तानच्या वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर ५.३६ पाकिस्तानी रुपये, तर हाय-स्पीड डिझेलमध्ये ११.३७ पाकिस्तानी रुपये इतकी मोठी वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलची किंमत २७२.१५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत २८४.३५ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. हे दर आजपासून (१६ जुलै) पुढील १५ दिवसांसाठी लागू झाले आहेत.
महागाईचा तडाखा आणि वाहनधारकांचे हाल
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहनचालक आणि वाहतूकदारांना
मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आधीच किमती गगनाला भिडत असताना नवीन दर नागरिकांच्या
खिशाला आणखी चाट लावणार आहेत.
पाकिस्तानची इंधनावर प्रचंड आयात अवलंबनता
पाकिस्तान आपल्या पेट्रोलियम गरजांपैकी सुमारे 85% इंधन आयात
करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या
तेलाच्या किमती आणि चलनवाढ याचा थेट परिणाम देशातील दरांवर होतो.
मध्य पूर्वेतील तणावाचा फटका
सरकारने इंधन वाढीचं मुख्य कारण सांगितलं आहे की, “जागतिक बाजारातील तेलाच्या किमतींचा चढउतार आणि मध्य पूर्वेतील तणावपूर्ण
परिस्थितीमुळे दर वाढले आहेत.”
याआधी जुलैच्या सुरुवातीलाही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते.
रात्रीच रांगा लावून नागरिकांची धावपळ
दर वाढ होणार असल्याच्या चर्चेनंतर नागरिकांनी मंगळवारी रात्री
पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लावल्या. लोकांनी किमती वाढण्यापूर्वी टाक्या
भरून घेतल्या.