अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला, अंत्यसंस्कारांना सुरुवात

बारामतीत बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झालं. त्यांचे पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अत्यं दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आज (दि. २९ जानेवारी) रोजी सकाळी ११ वाजता अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच अखेरचा निरोप देण्यात येईल. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह देशभरातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.