भारताविरुद्ध पुन्हा पाकिस्तानचा माघारचा खेळ; ज्युनियर हॉकी विश्वचषकातून संघ मागे
नवी दिल्ली/चेन्नई : एफआयएच पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेतून
पाकिस्तानने आपला संघ मागे घेतला आहे. या स्पर्धेचे आयोजन चेन्नई आणि मदुराई येथे
करण्यात आले असून, पाकिस्तान हॉकी महासंघाने (PHF) माघारीची अधिकृत घोषणा केली आहे. पाकिस्तानकडून दिलेल्या कारणांनुसार,
भारतासोबतचा राजकीय तणाव आणि सुरक्षा धोक्याचा मुद्दा यामुळे
सरकारने संघ भारतात पाठवू नये, असा सल्ला दिला आहे.: भारतातील
क्रीडा स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानने राजकारणाचा पत्ता टाकला आहे. भारतात
येत्या २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत आयोजित
PHF ची भूमिका:
पाकिस्तान हॉकी महासंघाचे सचिव राणा मुजाहिद म्हणाले, “आम्ही आपल्या सरकारचा सल्ला घेतला आहे. सध्याची परिस्थिती अनुकूल नाही.
राजकीय तणाव आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता, संघ भारतात
पाठवणे योग्य ठरणार नाही.” त्यांनी पुढे म्हटले की, “अलीकडील
आशिया कप क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन
केले नाही. तसेच भारतीय खेळाडूंनी आमच्या अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
दिला. त्यामुळे सरकारने हे गंभीरपणे घेतले आहे.”
पाकिस्तानचा सतत माघारीचा पॅटर्न:
हे पहिल्यांदा नाही की पाकिस्तानने अशा कारणांवरून
स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेतूनही
पाकिस्तानच्या ज्युनियर संघाने माघार घेतली होती. त्या माघारीमुळे पाकिस्तानला २०२६च्या
विश्वचषकासाठी पात्रता गमवावी लागली होती. या वेळेस क्रिकेटमधील ‘हस्तांदोलन न
करण्या’च्या घटनेचा दाखला देत हॉकीमधून माघार घेणे हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रीडा
तज्ञांच्या मते “हास्यास्पद आणि राजकारण प्रेरित” आहे.
दरम्यान, पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम सध्या
भारतात विश्वचषक स्पर्धा खेळत असून, २०२३ मध्ये पुरुष
क्रिकेट संघही भारतात खेळून गेला होता. त्यामुळे
“सुरक्षा” हा दिलेला बहाणा अधिक वादग्रस्त ठरत आहे.