पहलगाम हल्ल्याचा मास्टरप्लॅन पाकिस्तानातून; हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा पुन्हा सक्रिय

इस्लामाबाद  एप्रिल २६: जम्मू-काश्मीरमधील बैसारन व्हॅली, पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्याचे सूत्रधार म्हणून लष्कर-ए-तोयबा संघटनेचे नाव समोर आले आहे. या संघटनेचे प्रमुख हाफिज सईद आणि डिप्टी सैफुल्ला हे पाकिस्तानमधून थेट नियंत्रण ठेवत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी उघड केले आहे. परदेशी दहशतवादी, स्थानिक मदत हल्ल्यात परदेशी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, स्थानिक दहशतवादी व 'ओव्हरग्राऊंड वर्कर्स'कडून त्यांना मदत मिळाल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच प्रमुख 'हँडलर' असल्याची माहितीही समोर आली आहे. ISI चीही थेट मदत गुप्तचर अहवालानुसार, या दहशतवादी गटाला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून धोरणात्मक, आर्थिक व तांत्रिक मदत दिली जात आहे. लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांवर सईद व सैफुल्ला यांचे थेट नियंत्रण असून ते सध्या पाकिस्तानातून कार्यरत आहेत. हल्ल्याचा मागचा इतिहास या गटाने २०२४ मध्ये बुटा पात्री व सोनमर्ग येथेही मोठे हल्ले घडवले होते. बुटा पात्रीमध्ये दोन जवानांसह चार जण ठार झाले होते. सोनमर्गमध्ये सहा मजूर व एक डॉक्टर मृत्युमुखी पडले होते. हाशिम मुसा या दहशतवाद्याचा या हल्ल्यात सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताची तीव्र प्रतिक्रिया हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात राजनैतिक व सुरक्षा स्तरावर कडक पावले उचलली आहेत. सर्वपक्षीय बैठक घेत पाकिस्तानविरोधात पुढील कारवाईचे धोरण आखले गेले आहे. लवकरच अधिक ठोस आणि प्रभावी उत्तर देण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत.