२७ मेसाठी पुणे शहरात ‘ऑरेंज अलर्ट’; मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : महाराष्ट्रात मान्सनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा तडाखा बसला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने पुणे शहरासाठी २७ मे रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून धरण विसर्ग होण्यापूर्वी नागरिकांना २ तासांपूर्वी इशारा देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. इशारा देण्यासाठी भोंग्याचा वापर केला जाणार असून, पाणी शिरण्याचा धोका असलेल्या भागात ही यंत्रणा कायमस्वरुपी सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तिनांचा मृत्यू; जीवितहानीची चिंता वाढली गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
- कर्वेनगर
भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
- खेड
तालुक्यात,
भामा आसखेड धरणात मासेमारी करत असताना तरुणावर वीज कोसळून
मृत्यू
- दौंड
शहरात,
एका महिलेचा पावसामुळे मृत्यू
या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन
विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन
सतर्क गेल्या वर्षी पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला होता.
यामुळे नदीकाठच्या गावांत पाणी शिरले, वाहने वाहून गेली आणि
मोठे नुकसान झाले होते. यंदाचा पावसाळा अधिक तीव्र असल्याची शक्यता वर्तवली जात
आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व
संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.