संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा; खासदार प्रणिती शिंदे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

28 जुलै २०२५ रोजी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर
चर्चा झाली. यावेळी सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र
सरकारवर जोरदार टीका करत या ऑपरेशनला "तमाशा" म्हटले. त्यांनी सरकारकडे
थेट प्रश्न विचारले - या कारवाईत काय साध्य झाले? किती
दहशतवादी मारले गेले? किती लढाऊ विमाने गमावली गेली? पाकिस्तानने किती नुकसान केले? शिंदेंनी आरोप केला
की, सरकार केवळ मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी
अशा कारवाया करत आहे. "देशात प्रश्न विचारण्याचेही स्वातंत्र्य राहिलेले
नाही. सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे आणि मुख्य मुद्द्यांपासून जनतेचं लक्ष हटवत
आहे," असं त्यांनी म्हटलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशनबाबत सविस्तर माहिती दिली, परंतु विरोधकांनी समाधानकारक उत्तर नसल्याचा आरोप केला. याच चर्चेदरम्यान
गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले, "तुम्ही पुढील २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार आहात." शिंदेंनी आणखी
आरोप केला की, "पंतप्रधान नेहमी निवडणूक मोडमध्ये
असतात. दहशतवादी हल्ल्यानंतर ते निवडणूक सभेला जातात. शेजारी देशांसोबत भारताचे
संबंध बिघडले आहेत आणि चीनशी हातमिळवणी वाढली आहे."