एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून उत्तर प्रदेशातील घटना
.jpeg)
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. प्रेमपत्र न स्वीकारल्याने एका माथेफेरू मुलाने मुलीला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर फावड्याने वार करण्यात आले. मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या तीच्या आईलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलाचे एकतर्फी प्रेम होते. तर मुलीला तो आवडत नसल्याचे समजते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. गाजीपूर जिल्ह्यातील कारंडा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाशी हे प्रकरण संबंधित आहे. जिथे आनंद पांडे नावाच्या तरुणाचे त्याच गावातील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. पण मुलीला तो आवडत नाही. असे असूनही आनंद सारखा तीला अडवत असे. २१ जानेवारी रोजी आरोपी तरुण आनंद पांडे याने तिला जबरदस्तीने प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न केला. जे मुलीने स्वीकारण्यास नकार दिला.