महिला दिनी रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र; "एक खून माफ करण्याची" मागणी

जळगाव: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा
रोहिणी खडसे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांना एक विशेष पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी "आम्हाला एक खून माफ करा" अशी
मागणी करत महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज
अधोरेखित केली आहे. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
झाली आहे.
मुंबईत नुकत्याच १२ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक
बलात्काराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. ‘वर्ल्ड पॉपुलेशन रिव्ह्यू’च्या अहवालानुसार, भारत आशियातील महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे
म्हटले आहे. महिला बेपत्ता होण्याच्या, अपहरणाच्या आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ
झाली आहे.
"आम्हाला खून करायचाय…" –
रोहिणी खडसे
खडसे यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मागणीतील 'खून' हा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात
नसून एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आम्हाला खून करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा आणि निष्क्रिय
कायदा-सुव्यवस्थेचा."
महाराणी ताराराणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी
समाजसुधारण्यासाठी तलवार उचलली होती. मग आज आम्ही मागे का राहावे?" असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रपतींकडे काय मागणी?
महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात कडक कायदे करण्यात
यावेत.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी जलदगती
न्यायव्यवस्था कार्यान्वित केली जावी.
देशभरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी
केंद्राने ठोस निर्णय घ्यावा. या पत्राची जोरदार चर्चा सुरू असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून नव्या चर्चेला
सुरूवात झाली आहे.