विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्यादिवशी जितेंद्र आव्हाड चर्चेत

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या  पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळातील एन्ट्री चांगलीच गाजली. जितेंद्र आव्हाड चक्क हातात बेड्या घालून विधिमंडळात आले. त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीचे आमचा संविधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होत आलंच पाहिजे राईट एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीयांचं घर संसार उध्वस्त करणारे आहेत. ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात, दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं, पायात साखळ दंड, हातात हातकड्या, शौचालयाला जागा नाही, उपाशी, असं भारतीयांना अपमानित करून आणण्याचा प्रकार, हा भारतीयांना हिणवणारा भारतीयांना अपमानित करणार होता. याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते, आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण याच पेचात अडकलेत. पोरं अमेरिकेत राहतील, आई बाप मुंबई महाराष्ट्रात येतील, किंवा आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठ्या होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांच्या स्वप्नांना उध्वस्त होताना दिसत आहेत. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले,”जर या बेड्यांविरुद्ध आपण काही बोलणारच नसू , अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसून तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रतिनिधीक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी, की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतात या बेड्यांपेक्षा कमी नाही, आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. एक तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका, अमेरिका आपली बाप नाही, हे सांगण्यासाठी या बेड्या आहेत.” तसेच,”मला वाटतं नाही सरकार धनंजय मुंडेला बेड्या घालेल. खून त्यांनी केला नाही. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्तेचा मास्टर माइंड आहे आणि तो धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. धनंजय मुंडे यांनी हे स्वत: सांगितले आहे. तो तुमचा खास माणूस असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, “असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.