कर्मयोगी आप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय यांच्या वतीने राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन; पन्नास हजार रुपयाची पारितोषिके


प्रतिनिधी : सोलापुरातील नामांकित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने रविवारी   9 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कला महाविद्यालयास  यंदा पंचविसावे वर्ष पूर्ण होत आहे, याचे औचित्य साधून महाराष्ट्रातील कलावंतांसाठी खुल्या निसर्ग चित्रण स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांनी महाराष्ट्रातील सर्व कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सोलापुरातील प्रेक्षणीय स्थळांचे चित्रण हा विषय ठेवण्यात आलेला आहे . सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी साधारणपणे नऊ वाजता श्री संगमेश्वर महाविद्यालय आवार येथील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय येथे सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत नावे नोंदवून सोलापुर शहरातील कोणत्याही परिसरातील एखाद्या ठिकाणाचे चित्र रेखाटून रंगवून पूर्ण करून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणून द्यायचे आहे अशी सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड यांनी केले आहे. या स्पर्धेत भव्य पन्नास हजार रुपयाची एकत्रित प्रत्येकी पाच हजार रूपयांची दहा पारितोषिके देण्यात येणार आहेत. टॉप टेन बक्षिसे देण्यात येणार असून यासाठी शिल्पकार भगवान रामपुरे, उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसेनेत्र विशारद डॉ . उमा प्रधान, आर्किटेक्ट वैभव इंगळे , लोकसेवा हायस्कूलचे संस्थापक सुनील धोत्रे  , मॉडर्न स्टेशनरीचे  मयूर बाकळे , निवृत्त कलाशिक्षक रामचंद्र हक्के  ,   चित्रकार नितीन खिलारे, लोधेश्वर पेंटिंग कंपनीचे  देवीदास बडूरवाले  , लोटस एजन्सीचे  प्रसाद चोळचगुड्ड , मीनाक्षी ज्वेलर्सचे गोपी मीठ्ठा , व्हिफ्रेश एअर फ्रेशनरचे  विशाल सुर्डी ,श्रीमती सुमित्रा नागरतन इचगे यांच्या सहयोगाने पारितोषिके देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय , संगमेश्वर महाविद्यालय आवार येथे पार पडणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी चित्रे देऊन  उपस्थित रहायचे आहे.                   महाविद्यालयाच्या वतीने माहिती पत्रक देण्यात आलेले असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माहिती पत्रक वर दिलेले स्कॅनर स्कॅन करून पण नांव नोंदणी करून विद्यार्थी, हौशी  चित्रकार, चित्रकार कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा . मिनाक्षी रामपुरे, प्रा. देवेंद्र निंबर्गीकर, प्रा. मल्लिकार्जुन सालीमठ, प्रा. आशिष माशाळे , लिपिक श्रीपती गोटे, शिक्षकेतर कर्मचारी मठपती आदी परिश्रम घेत आहेत