देशमुख-पाटील वस्तीतील अडथळा हटवला; ५४ मीटर रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला

सोलापूर : देशमुख-पाटील वस्तीतील ५४ मीटर
रस्त्याला अडथळा ठरणारी सर्व १८ घरे शुक्रवारी (३० मे) उध्वस्त करण्यात आली.
त्यामुळे मरीआई चौक ते भैय्या चौक मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारा अडसर दूर झाला
आहे. लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ब्रिटिशकालीन
रेल्वे पूल पाडकामाला वेग या रस्त्याच्या उभारणीमुळे या मार्गावरील १०० वर्षांहून
अधिक जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याच्या कामाला वेग येणार आहे. सध्या या
पुलाचे 'कोअर कटिंग' पद्धतीने थिकनेस
(जाडी) तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पूल
पाडण्याच्या कामाला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.