आता फक्त 200 रुपयांत होणार जमिनीची मोजणी!

राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला असून जमिनीच्या मोजणीसाठी लागणाऱ्या शुल्कात मोठी कपात केली आहे. महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता केवळ ₹200 मध्ये हिश्शेवाटप मोजणी करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोजणी व जमिनीच्या विभाजनाची कामे आता कमी खर्चात पार पडणार आहेत.