सोलापूर: रमजानसाठी ‘पंढरीचे दूध’ नाही, जिल्हा दूध संघ अपयशी

सोलापूर: यावर्षी रमजान ईदसाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध विक्री करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पंढरीचे दूध मुस्लिम बांधवांच्या शिरखुर्म्यात नसणार आहे. पहिल्यांदाच संघ व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडल्याने खासगी दूध संघांनी संधी साधली आहे. पुणे जिल्ह्यातील एका संघाने तब्बल ३ लाख लिटर सुटे दूध विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने देखील ईदनिमित्त दूध विक्रीचे नियोजन केले आहे. आतापर्यंत दरवर्षी सोलापूर जिल्हा दूध संघ २ ते अडीच लाख लिटर दूध रमजानसाठी पुरवत असे. मात्र यावर्षी दूध संघाच्या नियोजनाच्या अभावामुळे ग्राहकांना बाहेरील दूध विकत घ्यावे लागत आहे. हक्काची बाजारपेठ असूनही संघाच्या व्यवस्थापनाच्या
अपयशामुळे यंदा मोठा व्यवसाय साधता आला नाही, अशी टीका होत आहे.