अक्कलकोट बसस्थानकात अतिक्रमण होऊ देणार नाही" - आमदार सचिन कल्याणशेट्टी
.jpeg)
अक्कलकोट शहरातील बसस्थानकात काही लोकांनी बसस्थानकाच्या मागच्या बाजूने पायवाट देण्याची मागणी करत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मंत्री महोदयांनी कंपाउंड वॉलला लागून पायवाट देण्याचा सूचना केल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभागृहाचे व परिवहन मंत्रीमंत्री महोदयांचे लक्ष वेधले.
या मुद्द्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री मा.श्री. प्रताप सरनाईक यांनी अशी कोणतीही मागणी आलेली नसल्याचे स्पष्ट करत, अशा मागण्या आल्या तरी त्या फेटाळून लावल्या जातील, अशी ठाम भूमिका घेतली. तसेच, बसस्थानकाचे काम त्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना करणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता, मंत्री महोदयांनी सध्या ५५% काम पूर्ण झाले असून बसस्थानकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वस्त केले असल्याची माहिती.