लाडकी बहीण योजनेत भेदभाव नको : उध्दव ठाकरे

नागपूर, दि. १७-

विधानसभा निवडणूक झाली, आचारसंहिता संपली आहे. महिलांची मते मिळवण्यासाठी 'लाडकी बहीण योजना निवडणुकीच्याआधी आणण्यात आली आणि पैसे दिले गेले. आता ही योजना तत्काळ सुरू केली पाहिजे, असे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीला ठणकावून सांगितले, सरकारने आता आवडहती, नावडती बहीण असे न करता सवाँना पैसे दिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक यापूर्वी अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार होते. निवडणुकीचा निकाल सर्वांनाच अनपेक्षित आहे, त्यामुळे त्यांना ईव्हीएम सरकार म्हटले जाते. ईव्हीएम सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. जनता नाईलाजाने त्याच्याकडून अनेक अपेक्षा करत आहेत. काही गावांमध्ये निकालाविरोधात आंदोलने केली जात आहेत. विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. मंत्रिपद ज्यांना मिळाले व्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार जास्सा मोठ्याने वाजत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुदघावरून सरकारवर हल्लाबोल केला, उद्धव यांनी लाडकी बहीण योजनेवरून फडणवीस सरकारला सवाल विचारले, आपी कोणतेही निकष लावले नव्हते, मग लाडकी बहीणचे पैसे देताना आता निकष का लावताय? उसवडती, नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे, असे उद्धव म्हणाले.

लाइकी बहिणीवरून उध्दव ठाकरेंचा निशाणा उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही. महायुतीने सरकार स्थापन केले आहे. सरकारने 'लाडकी बहीण' योजना जाहीर केली होती. आता लाडक्या आमदारांची चर्चा सुरू झाली आहे. पण, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकारने 'लाडकी बहीण' योजनेवर स्थगिती आणली. या सरकारची योजना होती लाडकी बहीण, आता लाडके आमदार आणि नाराज आमदार गांची चर्चा सुरु झाली आहे. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली, आता ही योजना तत्काळ सुरू करण्यात यावी. लाडकी बहीण योजनेवर काही निकष लावणार, अशा बातम्या येत होत्त्या. आता हे निकष बाजूला ठेवून तत्काळ लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.