निंबाळकर यांच्या घराची दुसऱ्या दिवशीही झडाझडती

फलटण: सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजीवराजे
नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर
विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा घातला. तेथील तपासणी आज सलग दुसऱ्या
दिवशीही सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला
होता. काल सकाळी सहा वाजेपासून मुंबई, पुणे, आणि फलटण
मधील घरी आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता आज सलग
दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाकडून निंबाळकरांच्या घरात तपास सुरु करण्यात आला
आहे. यात फलटण आणि पुण्यातील घराचा देखील समावेश आहे. या संदर्भात संजीवराजे नाईक
निंबाळकर यांचे बंधू रहुनाथराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. या
प्रकरणात तपास यंत्रणावर कोणताच दबाव असेल, असे मला वाटत
नाही. मात्र, असला तरी तर त्यात काहीही सापडू शकत नाही.
त्यांचा राँग नंबर लागला आहे. लोक पॅनिक झाले आहेत. मात्र महाराष्ट्रातील काही
परिवार क्लिअर कट आहेत. त्यामुळे या प्रकरणात काहीही सापडणार नाही. काही निष्पन्न
होणार नाही. लोकांनी आश्वस्त राहावे, असे देखील रघुनाथराजे
निंबाळकर यांनी म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब आमच्याकडे आहे. त्यामुळे
याच्यातून काही निष्पन्न होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. हा केवळ एक
प्रक्रियेचा भाग आहे. झाले ते चांगलेच झाले. त्यामुळे साप साप म्हणून भुई थोपटणे
तरी बंद होईल. आयकर विभागाचे अधिकारी अतिशय व्यवस्थित रेकॉर्ड आयकरच्या छाप्याबाबत
कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही. काल सकाळी सहा वाजल्यापासूनच ही तपासणी सुरू
होती. फलटणमध्ये मात्र यामुळे खळबळ उडाली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी
संबंधित असलेल्या सगुणामाता कन्स्ट्रक्शन, कुरवली अॅग्री
फूड्स कंपनी आणि अरेस्टा मॅजिशियन कंपनी तरडगाव तसेच गोविंद मिल्क या कंपन्यांशी
संबंधित कागदपत्र केंद्रीय आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. दरम्यान,
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे
ते चुलत बंधू आहेत. या छाप्यानंतर त्यांनी व्हॉटसअपवर ठेवलेले स्टेटस चर्चेत होते.
त्यात म्हटले आहे, कृपया गर्दी करू नका. खात्याला काम करू
द्या. काळजी संजीवराजे यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. आयकर हा व्यवस्थित
भरलेला आहे. आयकराचा सोर्स देखील शुद्ध आहे. त्यामुळे कुठलीच वेडी वाकडी गोष्ट
नसल्याचे रघुनाथराजे यांनी म्हटले आहे. जे नागरिक घरासमोर जमा होत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की त्यांचा नेता हा दोन नंबरचा माणूस नाही. हा काही
बिहार नाही. सर्व व्यवस्थित आहे. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे.
मालोजीराजांच्या काळापासून आमचा सर्व हिशोब व्यवस्थित असल्याचे त्यांनी म्हटले
आहे. आमच्याकडे प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे. इन्कमचा सोर्स आहे. जे काही आहे ते
सर्व जुने आहे. नवीन यात काहीही नसल्याचे रघुनाथराजे यांनी म्हटले आहे. राँग नंबर
लागला आहे. लोकांनी काळजी करण्याचे अजिबात कारण नाही, असे
देखील रघुनाथराजे यांनी म्हटले आहे. संजीवराजे
नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. काल सकाळी सहा वाजता
आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील घरी दाखल झाले
होते. तेव्हापासून अजूनही पथकाकडून झाडाझडती सुरू आहे.