निकोलस पूरनची आंतरराष्ट्रीय निवृत्ती: वयाच्या २९ व्या वर्षी क्रिकेट विश्वाला धक्का

गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असताना, आता वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पूरननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. सोमवारी (१० जून) इंस्टाग्राम पोस्टद्वारे पूरनने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना भावनिक शब्दांत आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं. पूरनने लिहिलं, "खूप विचार आणि चिंतन केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजसाठी खेळणे, मरून रंगाची जर्सी घालणे, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि संघाचं नेतृत्व करणं हे माझ्यासाठी गौरवाचे क्षण होते. हे सर्व अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे." त्याने आपल्या चाहत्यांचे, कुटुंबाचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की, "माझ्या कारकिर्दीचा हा अध्याय संपला असला तरी, वेस्ट इंडिज क्रिकेटवरील माझं प्रेम कायम राहील."
पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द:
- ODI सामने: ६१
- धावा: १९8३
- सरासरी: ३९.६६
- शतके: ३ | अर्धशतके: ११
- विकेट्स: ६
- T20I सामने: १०६
- धावा: २२७५
- सरासरी: २६.१५
- स्ट्राईक रेट: १३६.४०
- अर्धशतके: १३
पूरनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले नव्हते, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचा वेगळा ठसा
उमटवला. तसेच, टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही त्याने काम
पाहिले होते.