मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

मुंबई :- मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर कचऱ्याच्या डब्यात एक नवजात बाळ सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाळाच्या हालचाली आणि रडण्याचा आवाज ऐकून तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. तत्काळ वैद्यकीय मदत बाळ अत्यंत अशक्त स्थितीत आढळले. त्वरित वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर बाळाला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या बाळावर उपचार सुरू आहेत. पोलिसांचा तपास सुरू या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि विमानतळावरील हालचालींची तपासणी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कोणीतरी बाळाला फेकून पळून गेले असावे. गुन्हा दाखल करून तपास पोलिसांनी या घटनेबाबत कलम ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, बाळाला येथे कोणी व का सोडले याचा शोध घेतला जात आहे. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडेकोट करण्यात आली आहे.