कोरोनाचा नवा प्रकार ‘JN.1’ भारतात सक्रिय; रुग्णसंख्या १००० च्या पुढे, केरळ-महाराष्ट्रात वाढता धोका

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोविड-१९ चा नवा JN.1 प्रकार झपाट्याने पसरत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या १,०१० सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे देशभरात सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आघाडीवर सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये ४३०, महाराष्ट्रात २०९ आणि दिल्लीत १०४ सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय गुजरात (८३), कर्नाटक (८०) आणि राजस्थान (७६) रुग्णसंख्येसह नजीकच्या काळात आकडे वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, “JN.1 प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी सध्या गंभीर धोका नाही.” JN.1 चे दोन मुख्य धोके या नवीन प्रकाराची दोन मुख्य धोकेदायक वैशिष्ट्ये पुढे आली आहेत:
1.
रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम – JN.1 हा प्रकार शरीराची प्रतिकारशक्ती
कमजोर करू शकतो.
2.
जास्त संसर्गक्षमतेचा धोका – एक व्यक्ती दुसऱ्याला संक्रमित करण्याची
शक्यता जास्त आहे.
ICMR चे महासंचालक
डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, “सध्या रुग्ण सौम्य
स्वरूपाचे आहेत, आणि मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल
होण्याचे प्रमाण नाही.”
रुग्णसंख्या का वाढतेय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणू सातत्याने आपले स्वरूप बदलत
असतो, ज्यामुळे शरीराला नवीन प्रकार समजण्यास वेळ लागतो. बहुतांश
नागरिकांनी लस घेतल्यानंतर एक वर्षाचा कालावधी लोटल्याने प्रतिकारशक्ती कमी झाली
आहे. त्यामुळे विषाणू काही लोकांमध्ये अधिक वेगाने पसरतो. सावधगिरीचा इशारा तज्ज्ञांनी
मास्कचा वापर, गर्दी टाळणे, आणि लसीकरण
अद्ययावत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली
तरी सतर्क राहणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.