1 जुलैपासून बदललेले नवे नियम – तुमच्या खिशावर आणि वेळापत्रकावर थेट परिणाम!

नवी दिल्ली – आजपासून म्हणजेच १ जुलैपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात
आले आहेत, ज्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट होणार आहे.
क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपासून रेल्वे आरक्षण, जीएसटी रिटर्न, UPI चार्जबॅक, एलपीजी सिलिंडरच्या किमती व जेट
इंधनापर्यंत अनेक गोष्टींचे नियम सुधारण्यात आले आहेत.
🔹 क्रेडिट कार्ड पेमेंट नियम
आता सर्व क्रेडिट कार्डधारकांना बिल भारत बिल पेमेंट
सिस्टमद्वारेच भरणे बंधनकारक झाले आहे. यामुळे बिलडेस्क, इन्फिबीम अव्हेन्यू, क्रेडिट, फोनपे या प्लॅटफॉर्मवर परिणाम होणार आहे.
🔹 नवीन पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य
नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी आता आधार पडताळणी आवश्यक केली
आहे. यापूर्वी इतर दस्तऐवज मान्य होते.
🔹 एलपीजी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त
दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत
५७ ते ५८ रुपयांनी कपात झाली आहे.
🔹 UPI चार्जबॅक नवे नियम
आता बँकांना NPCI ची मंजुरी न घेता चार्जबॅकची
पुनरप्रक्रिया करता येणार आहे.
🔹 रेल्वे आरक्षण चार्ट वेळ बदल
आता ट्रेनच्या सुटण्यापूर्वी ८ तास आधी आरक्षण चार्ट तयार
होईल. यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना वेळीच माहिती मिळेल.
🔹 GST रिटर्न
GSTN ने स्पष्ट केले आहे की, जीएसटीआर-३बी फॉर्म एडिट करता येणार नाही आणि तीन
वर्षांनंतर मागील तारखेचा रिटर्न भरता येणार नाही.
🔹 जेट इंधन दरवाढ
दिल्लीमध्ये जेट इंधन प्रति किलोलिटर सुमारे ८९,३४४ रुपये झाले असून, साडेसात टक्के दरवाढ नोंदवली गेली
आहे. हे बदल नागरिकांच्या व्यवहारांवर
आणि खर्चावर मोठा परिणाम करणार आहेत. नागरिकांनी वेळेत अपडेट राहून नियमांचे पालन
करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.