होनराव बंधूंमुळे कुंभारीची नवी ओळख आ. सचिन कल्याणशेट्टी : कुंभारी येथे जाहीर नागरी सत्कार

कुंभारी:  दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीला ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. त्या जोडीला होनराव बंधूंनी सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात कामगिरी करून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कुंभारी येथील गेनसिध्द ऍग्रो प्रोडूसर  कंपनी अंतर्गत सुरू केलेल्या समर्थ अमृत दूध प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी होनराव बंधूं व मित्र परिवाराच्या वतीने विकास पुरुष आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा जाहीर नागरिक सत्कार उद्योजक व अडत व्यापारी गजानन होनराव यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट तालुक्याला सिंचनासाठी उजनी धरणातून पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय गावांतर्गत विकासकामांबरोबरच गाव, वस्त्या यांना जोडण्यासाठी सुकर मार्ग त्यांनी करून दिले. मठ, मंदिरांना निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व क्षेत्रात उल्लेखनीय विकासकामे आ. कल्याणशेट्टी यांनी केली आहेत. यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे घोडदौड विकासाच्या देशाने सुरू असल्याने होनराव बंधू व मित्र परिवाराच्या वतीने उद्योजक व अडत व्यापारी गजानन होनराव यांनी त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला. यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व माजी नगरसेवक केदार उंबरजे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाव खेड्याच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून असल्याने गाव गाड्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना समृद्ध, सक्षम करणार आहे. महिला बचत गट, युवा उद्योजक घडवणे, स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या डोक्यावरील घागरी उतरवून घराघरात पाणी पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाची जोड देणार आहे. यासाठी गाई, म्हशी वाटपाबरोबरच कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे शोध घेणे, नवीन प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शिवाय विकासाच्या दृष्टीने कोणतीही कसूर भासू देणार नाही, असा विश्वास यावेळी आ. कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. सर्वार्थाने विकसित होत असलेल्या कुंभारी येथे होनराव बंधू यांनी सुरू केलेला समर्थ अमृत दूध प्रकल्प स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच पशुपालक आणि शेतकऱ्यांना आर्थिक सधनता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. होनराव बंधू यांची सचोटी, कष्ट, विश्वास ह्या व्यवसायाला देशाच्या पातळीवर पोचवेल याची खात्रीही आ. कल्याणशेट्टी यावेळी दिली. युवा उद्योजक गजानन होनराव यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल व्यवसाय, अडत आणि आता दूध प्रकल्प या माध्यमातून होनराव बंधू चांगली कामगिरी करत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.