नवीन राज्यपाल आणि नायब राज्यपाल नियुक्त; राष्ट्रपतींच्या आदेशाने मोठे बदल
.jpeg)
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती भवनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, प्रा. अशीम कुमार घोष यांची हरयाणाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पुसपती अशोक गजपती राजू यांना गोव्याचे राज्यपालपद देण्यात आले आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांची लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखचे विद्यमान नायब राज्यपाल ब्रिगेडिअर (निवृत्त) बी.डी. मिश्रा यांनी राजीनामा दिल्याने ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपतींनी त्यांच्या राजीनाम्याचा स्वीकार केला आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे लडाख, हरयाणा आणि गोवा या तीन ठिकाणच्या राजकीय प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाले आहे. या निर्णयावर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.