नवे आयुक्त डॉ.सचिन ओंबासे त्यांनी पदभार घेतला

सोलापूर : महापालिका आयुक्तपदावर
बदली झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी
दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शितल उगले यांच्याकडून
पदभार स्वीकारला. नव्या आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार
घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सोलापूर
महानगरपालिकेत येणारा प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या सुविधा मिळतील याकडे लक्ष
दिले जाईल. त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिला आहे, दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण
होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे यासाठी प्रसार माध्यमांची मदत आवश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले.