नीरज चोप्राचा सुवर्ण थ्रो! पॅरिस डायमंड लीग 2025 स्पर्धा जिंकली

पॅरिस (फ्रान्स) – भालाफेकीत भारताला अनेकवेळा अभिमानास्पद विजय मिळवून देणारा स्टार अॅथलिट नीरज चोप्रा याने २०२५ मधील पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. आठ वर्षांच्या खंडानंतर या स्पर्धेत परतलेल्या नीरजनं जोरदार पुनरागमन करत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. फ्रान्समधील स्टेड सेबास्तियन चार्लेटी येथे पार पडलेल्या पुरुष गटातील अंतिम फेरीत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटरचा शानदार थ्रो करत आघाडी घेतली. त्याच्या या थ्रोनंतर कोणीही त्याला मागे टाकू शकलं नाही.
नीरजची थ्रो क्रमवारी:
- 1ला थ्रो: 88.16 मी (सर्वोत्तम)
- 2रा थ्रो: 85.10 मी
- 3रा ते 5वा थ्रो: फाउल
- 6वा थ्रो: 82.89 मी
जर्मनीचा ज्युलियन वेबर याने 87.88मीटर थ्रो
करत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
पूर्वीची लढत आणि या विजयानं मिळालेली
प्रतिष्ठा:
नीरजने याआधी २०१७ साली पॅरिस डायमंड लीगमध्ये 84.67 मीटर थ्रोसह पाचव्या स्थानावर समाधान मानले होते. त्यानंतर २०२५ च्या मे महिन्यात पोलंड स्पर्धेतही त्याला वेबरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. वेबरने 8६.१४ मीटरचा थ्रो केला होता, तर नीरज ८४.१४ मीटरवर थांबला होता. दोहा डायमंड लीग 2025 मध्ये नीरजनं ९०.२३ मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो नोंदवला होता, मात्र वेबरने शेवटच्या थ्रोमध्ये ९१.०६ मीटरच्या फेकीसह नीरजवर मात केली होती. मात्र यावेळी, पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरजनं सुरुवातीच्या फेकीतच आपली ताकद दाखवत विजेतेपद खेचून आणले.