राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

सोलापूर : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पांजरपोळ चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी महाराजांच्या पराक्रमाची व विचारांची आठवण करत त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. या प्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, ओबीसी सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख, शिवाजी परळकर तसेच ॲड. जयप्रकाश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.