राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार VJNT सेलच्या वतीने विधिमंडळाच्या

मुंबई :- विधानभवन आवारात काल घडलेल्या वादग्रस्त प्रकारानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणांची भूमी आहे. मात्र, विधानभवनात घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून, ती राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे, असे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेले अनेक दिवस पवार कुटुंबावर आक्षेपार्ह व असभ्य शब्दांत टीका करत आहेत. हे लोक सभ्यतेच्या रेषा पार करत आहेत आणि त्यांना पाठीशी घालण्याचे काम खुद्द मुख्यमंत्री करत आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल विधानमंडळात काल घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ VJNT सेल अध्यक्ष महंमद इंडीकर आणि कार्याध्यक्ष अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी राज्याचे गृहमंत्री यांचा राजीनामा मागितला व भाजपने अशा लोकांपासून दूर राहावे, अशी मागणी केली. हे राज्य कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतराव नाईक, कै. वसंतदादा पाटील, कै. विलासराव देशमुख आणि शरद पवार यांसारख्या प्रतिष्ठित नेत्यांची संस्कृती जपत आले आहे. मात्र आजचे मुख्यमंत्री ही प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत,” असा आरोप या वेळी करण्यात आला.

आंदोलनात सहभागी प्रमुख कार्यकर्ते:

  • चंद्रकांत पवार (जनरल सरचिटणीस)
  • युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर
  • डॉ. दादाराव रोटे
  • सूर्यकांत शेरखाने (सरचिटणीस)
  • प्रवीण वाडे, संजय जाबा, जावेद शिकलकर, शक्ती कटकदौड, रामप्रसाद सोगालोलू, राम पवार, राकेश सोनी, चंद्रकांत लोंढे, संजू सरवदे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.